
ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध !
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, आम्ही राज्यातील ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे प्रस्थापित मराठ्यांसोबत आहेत गरीब मराठ्यांसोबत नाहीत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
लातूर येथे आयोजित केलेल्या वंचितच्या दोन दिवशीय अभ्यास शिबिरात आंबेडकर बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आणि शासनाने हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी तपासयाला सुरुवात केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे चुकीचे आहे. हे या समाजावर अन्याय करणार आहे, असे आंबेडकर म्हणाले.
जरांगे यांच्याकडे अजेंडा नाही, ते प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करत आहेत. गरीबांसाठी नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला कोणाचाच विरोध नाही. पण तसे न करता ओबीसीतून देण्याचा घाट घातला जात आहे. राज्यातील ओबीसींच्या मागे वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहणार आहे, असे देखील प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
भाजप ओबीसींचा शत्रू
प्रकाश आंबेडकर यांनी हैदराबाद गॅझेटीअर लागू केल्यानंतर सांगितले होते की, भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, आणि आरक्षण असूच नये असा गोंधळ घालायला त्यांनी सुरुवात केली आहे. भाजपकडून सांगितले जाते की, आमचा डीएनए हा ओबीसी आहे पण, ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की, ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे.