
दैनिक चालु वार्ता उमरी प्रतिनिधी-श्रीनिवास मुक्कावार
कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेने नुकतीच आपली २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा एमव्हीके कुसूमनगर वाघलवाडा येथे पार पडली असून, ठेवीदार ,कर्जदार,सभासद यांच्या विश्वासार्हता मुळे आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून गरुड झेप घेतली आहे. लोकांनी पतसंस्थेवर दाखवलेल्या विश्वासर्हता या बद्दल चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी नागरिकाचे ऋण व्यक्त केले.
यंदा एकूण व्यवसायात २३% वाढ नोंदवली गेली असून, निव्वळ नफा ७६.४६ लाखांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे १५% लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संस्थेच्या ठेवी २९३.४१ कोटी, स्वनिधी १२.७१ कोटी आणि कर्जवाटपातून येणारी रक्कम १८८.७३ कोटी इतकी असून, आर्थिक सक्षमता आणि शिस्त दाखवणारे हे आकडे मानले जात आहेत. यावर्षी ५,२७७ नव्या
सभासदांची भर पडली असून, एकूण सभासद संख्या आता ४३,९२४ वर पोहोचली आहे. संस्थेच्या २० शाखा, ज्यात मुख्य कार्यालयही नवीन मोंढा नांदेड येथे समाविष्ट आहे, पूर्णपणे CBS प्रणालीवर कार्यरत असून, AEPS आणि मिनी एटीएमद्वारे सदस्यांना १०,००० पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. NPA प्रमाण केवळ २.६४% असून, निव्वळ NPA शून्य आहे. ‘अ’ दर्जा मिळवलेली ही संस्था १००% संचालक व कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून दर्जेदार सेवा देण्याचा आश्वासन देते.
सामाजिक क्षेत्रातही संस्था पुढाकार घेत आहे. अपघातग्रस्तांना मदत, शाळांना संगणक व प्रोजेक्टर वाटप, तलावांची गाळमुक्ती आणि नालासंवर्धन यांसारख्या उपक्रमांमुळे संस्था सामाजिक जबाबदारी निभावत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना, संस्था भविष्यातील आर्थिक संधी शोधून नव्या सेवा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष आणि लोक कल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजींनी सभेत योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व सभासद, कर्मचारी, ठेवीदार यांचे आभार मानले. कार्यक्रमाला व्हिपीके पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन माधवराव पाटील बोडके, संचालक प्रभाकरराव पाटील पुयड, गणेशराव पाटील सरसे, अनिलशेठ काचावार, अनिल दर्डा, संभाजीराव बैनवाड, मारोतराव किनेवाड, किशनराव रॅपनवाड, सौ. सागरबाई मारोतराव कवळे, सौ. क्रांतीताई उमाजी पाटील नादरे, व्हिपीके उद्योग समूहाचे सिईओ संदीप पाटील कवळे, धर्माबाद मार्केट कमेटीचे माजी सभापती दत्ताहरी पाटील चोळाखेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हिमायतनगर सुभाषजी राठोड, देविदासराव बोमनाले, विठ्ठल मुक्कावार,पारस दर्डा, गजानन श्रीरामवार,उमाजी पाटील नादरे, नागनाथराव दोत्तलवार,संस्थेचे सचिव नागनाथराव पांचाळ, सिईओ अन्नाराव पाटील शिंदे, आर्थिक सल्लागार उदयकुमार कुलकर्णी, जनरल मॅनेजर नामदेवराव इंगोले सह सर्व शाखेचे शाखाव्यवस्थापक, अधिकारी कर्मचारी बांधव सह परिसरातील सर्व शेतकरी, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार आणि भाग भांडवलदार उपस्थित होते. सूत्रसंचालन अहवाल वाचन व्ही. एन सोळंके सर तर आभार बाळू उबाळे यांनी मानले. अनेक मान्यवरांनी कवळे गुरुर्जीचे कौतुक केले.