
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -एकनाथ गाडीवान.
देगलूर: तालुक्यातील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. दरम्यान शैक्षणिक जीवनात यश संपादन करण्यास तसेच परीक्षेला सामोरे जाताना जिद्द आणि ध्येय धोरण ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा तर निश्चितच परीक्षेत व जीवनात यश नक्कीच प्राप्त होते.असे प्रतिपादन देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी केले.
ते येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील शैक्षणिक वर्ष २०२४~ २५ मधील इयत्ता बारावी कला,वाणिज्य,विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभात बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार होते.
व्यासपीठावर कोषाध्यक्ष विलास तोटावार, विजय उनग्रतवार यांची उपस्थिती होती.
प्रारंभी संगीत विभागाचे
प्रा.सोमनाथ पवार, प्रकाश सोनकांबळे,विद्यार्थ्यांनी स्फूर्ती गीताचे गायन केले. उपप्राचार्य डॉ.एमएम चमकुडे तसेच उपप्राचार्य डाॅ.व्हि.जी. शेरीकर यांनी प्रास्ताविकातून कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करीत,बारावी परीक्षा संदर्भात महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली.परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासावर लक्ष कसे केद्रींत करावे यावर प्रकाश टाकला.गुणवंत विद्यार्थ्यांमधे
इयत्ता बारावी कला शाखेतून प्रथम आलेली कुमारी वैष्णवी बाबू बरगे, विज्ञान शाखेतील कृष्णा शिवचरण गुरूडे, वाणिज्य शाखेतील स्फूर्ती इरवंत मोखेडे यांचा तसेच यावर्षीचे विविध विषयांतील प्रथम क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थ्यातील पुष्करा देशपांडे, बिरादार श्रुतिका, कस्तुरी किशन पोतुलवार, ताडकोले श्रीहरी शिवकुमार, सोरटे आदित्य,कु. दिव्या सोमुरे ,कु.दिपाली जाधव तसेच वैद्यकीय शिक्षणास पात्र ठरलेल्या कु.अनन्या सुनील कुलकर्णी, कृष्णा शिवचरण गुरूडे, महेश बालाजी गुडफळे, यांचा तसेच क्रीडा क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतिने सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन केलेले क्रिडा शिक्षक प्रा.सिताराम हाके यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
शेवटी अध्यक्षीय समारोपात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत, महाविद्यालयात राबवित असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती कार्यकारिणी सदस्य देवेंद्र मोतेवार यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश कुलकर्णी,आभार प्रा. निकिता ऐनलावार यांनी मानले कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार अधीक्षक गोविंद जोशी पर्यवेक्षक एस. एन. पाटील उपप्राचार्य डाॅ.चमकुडे एम.एम. उपप्रचार्य डाॅ. शेरीकर व्ही जी. बक्षिस वितरण समिती संयोजक प्रा.शिवचरण गुरूडे,सदस्य प्रा.बाळासाहेब नागरगोजे डॉ.चंद्रशेखर बाकेवाड प्रा.दत्ता पाटील प्रा.तुकाराम लागले तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.