
दैनिक चालु वार्ता मोहोळ प्रतिनिधी-बापू घळके
महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष
मोहोळ मतदारसंघाचे सलग तीन टर्म विधानसभेचे प्रतिनिधित्व स्वतः करणाऱ्या जेष्ठ नेते राजन पाटील -अनगरकर यांनी मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर सलग तीन टर्म पक्षाने दिलेल्या तीन वेगवेगळ्या उमेदवारांना मोहोळ विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्याची किंगमेकर भूमिका बजावली आहे.. मोहोळ तालुक्याच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या राजन पाटील यांच्या मंत्री पदाच्या रूपाने मोहोळ तालुक्याला कै.शहाजीराव पाटील यांच्यानंतर दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपद मिळाले आहे.. लोकनेते सारख्या अल्पावधीतच कर्जमुक्त आणि आसवणी आणि सहवीज निर्मिती प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या जिल्ह्यातील नावाजलेल्या साखर कारखान्याच्या उभारणी बरोबर मोहोळ तालुक्याच्या उर्वरित जलसिंचनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादांच्या माध्यमातून हजारो कोटींचा सिंचन निधी आणण्यामध्ये राजन पाटील यांचे मोठे योगदान आहे. अजोड पक्षनिष्ठेची महत्त्वपूर्ण पोचपावती या राज्यमंत्रीपदाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी अनगरकर – पाटील परिवाराला दिले आहे.