पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल; पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार…
पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रोच्या कामाचा प्रश्न अखेर सुटला आहे. या कामाशी संबंधित तिढा सोडवण्यामध्ये यंत्रणांना यश मिळाले आहे.
रामवाडी ते वाघोली यादरम्यान मेट्रोचे काम महामेट्रो करणार आहे. त्यासोबत वाहनांसाठी उड्डाणपूलदेखील महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून बांधला जाणार आहे. मेट्रो प्रशासनाने वाघोलीपर्यंत केलेल्या कामाचा खर्च एमएसआयडीसीकडून महामेट्रोला दिला जाणार आहे.
पुणे मेट्रो मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या रामवाडी ते वाघोली मार्गासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. पाच मार्गावर मेट्रोच्या आखणीत दुहेरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी वाघोलीपर्यंतचे काम कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणजेच पूर्वी एमएसआयडीसीने दुहेरी उड्डाणपूलासाठी निविदा काढल्यामुळे कामाचा स्पष्ट मार्ग ठरला नव्हता.

एमएसआयडीसी, महामेट्रो प्रशासन आणि एनएचएआय अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये रामवाडी ते वाघोली यादरम्यानचा ११.६३ किमीचा डबलडेकर मार्ग महामेट्रोच करणार असल्याचा निर्णय झाला. या प्रकल्पासाठी सुमारे ३,६२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. पुणे मेट्रो मार्गिकेसह महामार्गाचे कामही डबलडेकर मार्गात येणार असल्यामुळे एकूणच प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. अतिरिक्त खर्च एमएसआयडीसीकडून दिला जाणार आहे. वाघोलीपुढील काम मात्र एमएसआयडीसी करणार आहे.
सध्या मेट्रोच्या कामांसाठी कर्ज घेण्यात आले आहे. पण उर्वरित पैशांची तरतूद कशी करायची याबाबत लवकरच मुख्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठक पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. वनाझ-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) या मार्गांसाठी एकूण ३,७५६ कोटी ५८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा संपूर्ण उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकृतरित्या मान्य करण्यात आला आहे.