
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चर्चेत आहेत. अनेक वर्षांचे चांगलेच संबंध ताणल्याचे सध्या बघायला मिळत आहे. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा बंद होती.
टॅरिफनंतर अमेरिकेने H-1B व्हिसाचा देखील धक्कादायक निर्णय घेतला. भारतीय नागरिक हे मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये H-1B व्हिसावर नोकऱ्या करतात. डोनाल्ड ट्रम्प यांना काहीही करून भारताला कोंडीत पकडायचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारतावर टॅरिफ लावल्यानंतरही नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत आणि भारत अमेरिकेचे मजबूत संबंध असल्याचे परत परत म्हणताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. मात्र, भारतावर अत्यंत गंभीर असे निर्बंध लादताना दिसत आहेत.
आता भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. इतक्या दिवसांच्या ताणलेल्या संबंधात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल अमेरिकेत पोहोचले आहेत. यादरम्यान काही महत्वाच्या करारावर चर्चा होणार आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयातील एक पथक 16 सप्टेंबर रोजी भारतात आले होते. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे अमेरिकेत पोहोचले आहेत.
अमेरिकन शिष्टमंडळ परत गेल्यानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे भारतीय शिष्टमंडळासह अमेरिकेला निघाले. ते अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांची भेट घेतील आणि दोन्ही देशांच्या संबंधांवर चर्चा करतील. टॅरिफच्या वादानंतर या भेटीला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. दोन्ही देशांमध्ये यादरम्यानच्या काळात महत्वाचे करार होण्याचे संकेत आहेत. शिवाय टॅरिफवर काय निर्णय होतो याकडे जगाच्या नजरा आहेत.
रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिका दबाव टाकण्याचे काम करत आहे. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत होणार निर्णयात जवळपास भारताकडून बंद करण्यात आली आहे. याचा फटका भारतापेक्षा अधिक अमेरिकेला बसताना दिसत आहे. त्यामध्येच आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत.