
ठाकरेंना लिहिलेले पत्र आले समोर !
राज्यात गेल्या दोन आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ संहितेत ‘ओला दुष्काळ’ कुठेही नाही असे सांगत, ओला दुष्काळाची मागणी पुरती फेटाळून लावली.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. यासंबंधीचे पत्र आता समोर आले आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ ही संकल्पना होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 16 ऑक्टोबर 2020 रोजी पत्र लिहिले होते. या पत्राचा विषयच होता की, परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत, आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत.
राज्यात २०२०च्या ऑक्टोबरमध्ये 3 ते 4 दिवस परतीचा पाऊस झाला होता. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले होते. तेव्हा तत्कालिन ठाकरे सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले होते, तेव्हाच तत्कालिन विरोधी पक्षनेते फडणवीसांनी राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्ध सरकारकडून दिला जात नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, असे म्हटले होते.
याच पत्रच्या शेवटच्या परिच्छेदात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती!
देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रामुळे ओला दुष्काळ ही संकल्पाना राज्याच्या दुष्काळ संहितेत खरोखर आहे की नाही, याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. कारण विरोधी पक्षनेते असताना त्यांनीच ओला दुष्काळ जाहीर करुन मदत दिली पाहिजे मागणी केली होती. आता 2020 पेक्षा अधिक गंभीर परिस्थिती आहे. मराठवाड्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. शेती खरवडून गेली आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्तांना दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या उपाययोजना केल्या जातात किंवा सवलती दिल्या जातात तशाच सवलती पूरग्रस्तांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आहे.