
नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले ?
राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आरएसएसच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. यावेळी त्यांनी आरएसएसचे खूप कौतुक केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सांगिते की, आरएसएसचा गौरवशाली १०० वर्षांचा प्रवास हा त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी आणि शिस्तीचे एक असाधारण उदाहरण आहे.
स्वयंसेवक पिढीला संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे. तसेच आरएसएसने स्थापनेपासूनच राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
“१९६३ मध्ये, संघ स्वयंसेवकांनी २६ जानेवारीच्या परेडमध्येही भाग घेतला होता. त्यांनी देशभक्तीच्या तालावर मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने कूच केली. हे टपाल तिकीट राष्ट्रसेवा करणाऱ्या आणि समाजाला सक्षम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रतिबिंब देखील आहे. या स्मारक नाण्यांसाठी आणि टपाल तिकिटांसाठी मी देशवासियांचे मनापासून अभिनंदन करतो.”, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच “आज, भारत सरकारने संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करण्यासाठी विशेष टपाल तिकिटे आणि स्मारक नाणी जारी केली आहेत. १०० रुपयांच्या या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंह आहे.”, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “संघाच्या शताब्दी वर्षाचा असा महान प्रसंग आपण पाहत आहोत हे आपल्या पिढीतील स्वयंसेवकांचे भाग्य आहे. या प्रसंगी, मी राष्ट्रसेवेसाठी समर्पित करोडो स्वयंसेवकांना शुभेच्छा आणि अभिनंदन देतो. संघाचे संस्थापक, आपले आदर्श, परमपूज्य डॉ. हेडगेवार जी यांच्या चरणी मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज महानवमी आहे. आज देवी सिद्धिदात्रीचा दिवस आहे. मी सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. उद्या विजयादशमीचा महान सण आहे. अन्यायावर न्यायाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय, विजयादशमी ही भारतीय संस्कृतीच्या या विचाराची आणि श्रद्धेची कालातीत घोषणा आहे.”
टपाल तिकिटे आणि नाणी खास का ?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, या १०० वर्षांच्या प्रवासाचे सेलिब्रेशन करताना, सरकारने एक विशेष टपाल तिकिटे आणि नाणे जारी केले आहे. १०० रुपयांच्या या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंह आणि स्वयंसेवक भक्तीने नतमस्तक होत असलेली भारत मातेची प्रतिमा आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की भारत मातेची प्रतिमा भारतीय चलनावर आहे, कदाचित स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे.
पंतप्रधान म्हणाले की, आज जारी केलेले विशेष टपाल तिकिटे देखील अद्वितीय आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे. १९६३ मध्ये, २६ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी राष्ट्रीय परेडमध्ये भाग घेतला आणि देशभक्तीच्या सुरांवर अभिमानाने कूच केली. हे टपाल तिकिटे त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करते. हे टपाल तिकिटे राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाचे देखील प्रतिबिंबित करते. मी देशवासियांचे याबद्दल अभिनंदन करतो, असं देखील मोदींनी यावेळी सांगितले.