
गेम चेंजर !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत दावा करत आहेत की, मी जगातील मोठी 7 युद्धे थांबवली. त्यामध्येच त्यांनी गाझामधील शांततेसाठी एक प्रस्ताव ठेवला. 20 कलमी त्यांच्या या प्रस्तावाला इस्त्रायलने पाठिंबा दिला.
मात्र, हमासकडून अजून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गाझातील शांततेसाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत असल्याने अनेक देशांनी त्यांना पाठिंबा दिला. हेच नाही तर गाझा शांत होण्याच्या स्थितीवर आहे. 20 कलमी प्रस्ताव मान्य करण्यासाठी हमासवर दबाव टाकला जातोय आणि हमास तो प्रस्ताव मान्य करण्याचे संकेत असतानाच आता व्हाईट हाऊसने या उपक्रमाचे वर्णन युद्धग्रस्त गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्पची दूरदर्शी योजना म्हणून केले आहे.
अमेरिकन प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या गाझा शांतता योजनेला पाठिंबा असल्याचे आता अधोरेखित केले आहे. व्हाईट हाऊसने, जग या योजनेकडे गेम चेंजर म्हणून पाहत असल्याचा दावा केला आहे. व्हाईट हाऊसने म्हटले की, गाझाला शाश्वत शांततेच्या ठिकाणी परत आणण्याचे अंतिम उद्दिष्ट ठेऊन युद्ध तात्काळ थांबवणे, ओलिसांची सुटका करणे याकरिता भर दिला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास आणि इस्त्रायल युद्दात 20 कलमी प्रस्ताव ठेवला. ज्यानंतर जवळपास देशांनी त्यांच्या या प्रस्तावाला समर्थन दर्शवले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव मुस्लिम देशांना हाताशी धरून केला होता. इस्त्रायलने देखील याला मान्यता असल्याचे म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून गाझा पट्टी अशांत आहे. गाझा पट्टीतील लोकांना शांतता हवी आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल पुरस्कारासाठी दावा करताना अनेकदा दिसले आहेत. मात्र, आता त्यांनी स्वत:ची भूमिका बदल थेट म्हटले की, मला हमास आणि इस्त्रायलमध्ये फक्त शांतता पाहिजे आहे. मला नोबेल शांती पुरस्कार नको. मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध देखील ताणली आहेत.