
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
कंधार प्रतिनीधी –
मागील दिड महिन्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यावर वरुण राजाने न भुतो न भविष्यती पावसाची बरसात केली.त्यामुळे नेहमी कोरड्या दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यावर चक्क आभाळ फाटून ढगफुटीच्या अरिष्टातून अतिवृष्टी झाल्याने माझ्या शेतकरी राजांच्या जमीन खरडून गेली,पिक होत्याचे नव्हते झाले.
अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत व्हावी.या उद्देशाने मन्याड नदीच्या थडीवरचे तीर्थक्षेत्र श्री संत नामदेव महाराज संस्थान श्रीक्षेत्र उमरजचे मठाधिपती गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता २ लक्ष ५१ हजारांचा धनादेश आज जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यामध्ये वित्तहानी, जिवितहानी,मुक्या जनावरांवर जणु संक्रांत आली. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी या पुरामध्ये आपले प्राण गमावले. शेतकरी आर्थिक संकटात असतांना मदतीचा हात म्हणून सामाजिक भावनेची जाण ठेवून श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज ता. कंधारचे मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या वतीन दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता २ लक्ष ५१ हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले यांच्याकडे सुपूर्द केला.
श्री संत नामदेव महाराज संस्थान हे धार्मिक कार्यासह सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असते. कोरोना काळामध्ये नागरिकांना गरजूंना भोजनाचे डबे वाटप, मास्क वाटप करणे, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता, जनावरांसाठी आरोग्य शिबिर, शेतकऱ्यांसाठी अभ्यास वर्ग, स्वच्छता अभियान,गोमाता रक्षणासाठी गोशाळा अशा अनेक उपक्रमांमध्ये हे संस्थान सदैव अग्रेसर होते. १९९९ च्या भारत-पाकिस्तान यांच्यातल्या कारगील युद्धात वीर भारतीय सैनिकांनी २६ जुलै १९९९ रोजी भारताने विजय मिळविला.त्यावेळी संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरजचे तत्कालीन मठाधिराज ह.भ.प. उध्दव गुरु नामदेव महाराज आणि श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक व संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी थोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून संयुक्त विद्यमाने भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याला सलामी देण्यासाठी कंधार मामलेदार साहेबांकडे मिरवणुकीने “चांदीची बोफोर्स तोफ” सुपुर्द करुन मठ संस्थान देशभक्तीतही मागे नाही,जणु याची साक्ष दिली.सध्याच्या काळात मन्याड खोर्यातून प्रथम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज हे पुढे सरसावले.कालपरवा फेब्रुवारी 2025 रोजी मठ संस्थानाच्या कलशारोहण समारंभ निमित्त भव्य आणि दिव्य सोहळा आयोजित केला त्यात देवकीनंदन ठाकूर यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा चे आयोजन करून मराठवाड्यामध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला त्या कार्यक्रमाला आर्थिक खर्च देखील भरपूर आला होता तरीपण महापुरा च्या संकटात सापडलेल्याना अडीच लाखाची मदत देऊन मानवता जपली आहे .
या प्रसंगी ॲड. मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, ॲड. गंगाप्रसाद यन्नावार, प्रदीप शिंदे, सनदी लेखापाल बाळकृष्ण गबाळे, जगदीश धोंड, प्रवीण बनसोडे यांची उपस्थिती होती. श्री संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरज यांच्या सामाजिक बांधिलकीतून मानवतावाद जपल्या बद्दल वंदनीय संतश्रेष्ठ गुरुवर्य मठाधिराज महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या सामाजिक बांधिलकीला नतमस्तक! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार