
शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादाच्या प्रकरणावर 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. परंतु, 1 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिला.
दरम्यान, मागील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले होते की, या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, त्यामुळे आम्ही एकदाच काय ते या प्रकरणावर निकाल देऊ. तसेच हे प्रकरण लवकरात लवकर संपवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी 19 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत पार पडली. त्यानंतर 8 ऑक्टोबरला याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.