
तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय; छगन भुजबळ कडाडले !
राधाकृष्ण विखे पाटील हे कुठल्या कारणासाठी मनोज जरांगे पाटील यांनाभेटले आणि काय निरोप घेऊन गेले, हे मला माहिती नाही.
GR निघाल्यावर काल आजून काही आत्महत्या झाल्या आहेत. आतापर्यंत 14 ते 15 आत्महत्या झाल्या आहेत. आमच्या आरक्षणाला धक्का लागला आहे, हे लोकांचे ठाम मत झाले आहे. मागासवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी एक जात नाही, एक मोठा समाज आहे. ओबीसीजातनाहीतरप्रवर्गआहे. मात्रमराठ्यांनाओबीसीठरवल्यासनामराठ्यांनालाभमिळेल, नाही ओबीसींनाअशीप्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीदिलीआहे.
आरक्षणासाठी 15 जणांनी आत्महत्या केल्या, तोंड दाबून मार सहन करावा लागतोय
तुम्ही जास्त लोक चुकीच्या मार्गाने भरले तर मग धक्का कसा लागणार नाही? मनोज जारांगे माझ्या बद्दल चुकीचे बोलतात आणि चुकीचे शब्द वापरतात म्हणून मी बोलतो. हाके आणि वाघमारे यांच्यावर हल्ला झाला. आम्ही असे वागत नाहीये, आम्ही सरकारला सांगतोय, आमचा समाज गरीब आहे आणि राजकीय ताकत आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्ही तोंड दाबून लाथाबुक्क्याचा मार खात आहोत. इतर ओबीसी नेते का पुढे येत नाहीत? मला माहिती नाही पण मी लढत आहे. असेही छगन भुजबळ यावेळीम्हणाले.
सगळ्याच ठिकाणी मला जाता येणार नाही
बीडचा मोर्चा महात्मा फुले समता परिषद आयोजित केलेला हा मोर्चा आहे. आमच्या सभेत मराठा समाजाला टार्गेट करणार नाही आणि आतापर्यंत आम्ही ते केलेलंही नाही. सोकॉल्ड नेत्या विरोध आमची ही सभा आहे. नागपुरातआजओबीसीमोर्चाआहे. मात्र सगळ्या ठिकाणी मला जाता येणार नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात ते बोलतात आणि ते विरोधी पक्षाचे नेते आहेत ते बोलणारच असेही छगन भुजबळ यावेळीम्हणाले.
ओबीसींचा आज नागपुरात महामोर्चा
ओबीसी समाजाकडून नागपुरात आज एक मोठा मोर्चा काढण्यात येत आहे. 2002 साली बनलेल्या हैद्राबाद गॅझेटियर आणि मराठा गॅझेटियर संदर्भातला GR रद्द करण्यात यावा, ही या मोर्चाची मुख्य मागणी आहे. हा मोर्चा यशवंतस्टेडियम जवळून सुरू होऊन सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतर कापून संविधानचौकपर्यंत पोहोचेल. संविधानचौक येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या मोर्चामध्ये विविध OBC संघटनांचे प्रतिनिधी आणि विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हजारो OBC बांधव सहभागी होत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी विशेष पुढाकार घेतला असला तरी, हा मोर्चा OBC समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या मोर्चातून OBC समाजाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.