
बुऱ्हानगर सरपंच ते राज्यमंत्री…
ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या मतदार संघात शोककळा पसरली. राज्यातील अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रद्धाजंली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी जवळचा सहकारी गेल्याची भावना व्यक्त करत म्हटले की, विधिमंडळातील माझे सहकारी, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नगर शहराजवळील बुऱ्हाणनगरच्या सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आमदार व मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. कर्डीले कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अतिशय सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवाजीराव कर्डिले यांनी आपला राजकिय प्रवास सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी अनेक पदे भूषवली. नगर जिल्हात त्यांचे मोठे वलय होते. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली.
1 जून 1958 जन्म
1984-95 बुऱ्हानगर सरपंच
1990 बानेश्वर शैक्षणिक संस्था
1995 नगर नेवासा अपक्ष आमदार
1999 नगर नेवासा अपक्ष आमदार
2003-04 राज्य मंत्री, मत्स्य व बंदरे विकास
2004 राष्ट्रवादी नगर नेवासा आमदार
2007 ADCC संचालक
2008-9 ADCC चेअरमन
2009 नगर दक्षिण खासदार राष्ट्रवादी उमेदवारी पराभव
2009 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार
2014 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार
2019 भाजप राहुरी नगर पाथर्डी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव
2024 भाजप राहुरी नगर पाथर्डी
2023 चेअरमन ADCC