
थेट पुतिन यांच्यासोबत दोन तास फोनवर चर्चा; खळबळ उडवणारा…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेल खरेदीबाबत मोठा दावा केला. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसलयाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगताच जगात खळबळ उडाली. मात्र, यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली.
हमास-इस्त्रायल युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनच्या युद्धात लक्ष घालताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बराचवेळ चर्चा केली. काही दिवसांपूर्वीच दोन्ही नेत्यांची भेट देखील झाली होती. मात्र, मार्ग काही निघू शकला नाही. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत संपर्क साधत थेट दोन तास चर्चा केल्याची माहिती आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक भीषण केली आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत झालेला संवाद सोशल मीडियावर सांगितलाय. ट्रम्प यांनी म्हटले की, मी नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी टेलिफोनवरून संभाषण संपवला. खरोखरच हे बोलणे चांगले ठरले आणि फायद्याचेही. मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी माझे आणि अमेरिकेचे अभिनंदन केले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुमचे युक्रेनसोबतचे युद्ध संपल्यानंतर आपल्यात व्यापार चर्चा होईल.
पुढच्या दोन आठवड्यात दोन्ही देशांच्या उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक होईल. ही बैठक रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यासाठी होईल. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबतही अमेरिका बैठक करणार आहे. झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला मोठी मदत मागितली. अमेरिकेकडून प्रगत शस्त्रे मिळावी, याकरिता ते अमेरिकेकडून मदत मागत आहेत. मात्र, अमेरिकेने जर हे शस्त्रे युक्रेनला दिली तर रशियाचे मोठे नुकसान होऊ शकते.
युक्रेनने अमेरिकेकडे लांब पल्ल्याचे टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्र मागितले, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केली आहेत. अमेरिेकेने युक्रेनला टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्र देऊ नये, नाही तर अमेरिका रशियातील संबंध अधिक बिघडतील, असे स्पष्ट रशियाने म्हटले. जर अमेरिकेने हे शस्त्र युक्रेनला दिले तर आमचे अधिक नुकसान होईल. मात्र, रशिया आपल्या सुरक्षेसाठी तयार आहे.