अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून आश्चर्यकारक असे निर्णय घेत आहेत. त्यांनी भारतावर टॅरिफ लादला होता. आता ट्रम्प यांनी चीनकडे आपला मोर्चा वळवला आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प अमेरिका फस्ट हे आपले धोरण लावून धरत आहेत. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी याच धोरणाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा आणि धक्कादायक निर्णय गेतला आहे. या निर्णयामुळे आता जगभरात खळबळ उडाली असून एका देशाल चांगलाच फटका बसणार आहे. ट्रम्प यांनी त्या देशासोबतच्या सर्व व्यापारविषयक चर्चांना स्थगिती दिली आहे.
नेमका काय निर्णय घेतला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (23 ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी कॅनडा या देशासोबत चालू असलेल्या व्यापारविषयक सर्व चर्चा संपवण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाकडून चालवल्या जात असलेल्या एका खोट्या जाहिरातीचा हवाला देत ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे एक विधान चुकीच्या पद्धतीने दाखवले जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर आमची ही बैठक चांगली झाली. कार्नी अमेरिकेतून आनंदी होऊन परततील, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या या विधानानंतर कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता मात्र ट्रम्प यांनी कॅनडाला मोठा झटका दिला असून कॅनडासोबतच्या व्यापारविषयक सर्व चर्चा थांबवल्या आहेत.
ट्रम्प यांनी नेमकी काय घोषणा केली?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडिया मंचावर कॅनडासोबतच्या करारासंदर्भात घोषणा केली. “कॅनडाकडून एक खोटी जाहिरात चालवली जात आहे. या जाहिरातीत रोनाल्ड रिगन यांचे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. या जाहिरातीमुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव पडू शकतो. या लाजीरवाण्या कृत्यामुळे अमेरिका कॅनडासोबतच्या सर्व व्यापारविषयक चर्चा तत्काळ थांबवत आहे,” असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
अत्यंत जास्त टॅरिफमुळे गंभीर व्यापार युद्धांचा जन्म होतो, असे भाष्य रिगन म्हणाले होते. दरम्यान, आता याच विधानावर आक्षेप नोंदवत ट्रम्प यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


