SP ना फोन करुन दिला आदेश; तुम्ही आधी…
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. संपदा मुंडेने एका हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केली असून, टोकाचं पाऊल उचलण्याआधी दोन पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख केला आहे.
तिने हातावर सुसाईड नोट लिहिली असून, आपल्यावर चार महिने बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.
फडणवीसांकडून पोलिसांवर निलंबनाची कारवाई
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस अधिक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
नेमकं काय घडलं ?
संपदा मुंडे नावाच्या डॉक्टर आणि जिल्हा पोलिसांमध्ये वैद्यकीय तपासणीवरून सुरू असलेल्या वादातून हे घडल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वी वाद झाला होता, त्यानंतर डॉक्टरविरुद्ध विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
डॉ. मुंडे यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आपल्याला अन्यायपूर्ण वागणूक दिली जात आहे आणि जर कथित गैरवर्तन थांबले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरण चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे.
हातावरील सुसाईड नोटवर काय लिहिलं आहे ?
माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे, ज्याने माझ्यावर 4 महिने बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागील 4 महिने शारिरीक आणि मानसिक छळ केला,” असं तिने हातावरील सुसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर राहत होती त्या घरमालकाचा मुलगा आहे.
दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करुन काही होणार नाही – सुषमा अंधारे
या संपूर्ण घटनेत महिला डॉक्टरने ज्या प्रकारे हातावर दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहून आत्महत्या केली आहे, त्यानुसार कारवाई होईलच. मला वाटतं फक्त त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करुन काही होणार नाही. मुद्दा आहे की, सदरील महिला मागील 3 महिने मानसिक छळ आणि लैंगिक अत्याचाराला सामोरी जात होती अशी माहिती समोर येत आहे. हे होत असताना तिने ज्या यंत्रणांकडे मदत मागितली त्यांनी काय केलं? संबंधित डॉक्टर महिलेने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं होतं का? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडून आपण सुरक्षेची अपेक्षा करतो जर ते रक्षकच भक्षक होत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा? याप्रकऱणी स्वतंत्र एसआयटी नेमली पाहिजे. आता नव्याने कायदा करण्याची गरज आहे, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.


