मुख्यमंत्री फडणवीसांचा जिव्हारी लागणारा वार !
राज्यात जी अतिवृष्टी आणि महापूर आला, त्यावर राज्य सरकारच्यावतीने जे रिलीफ पॅकेज देण्यात आलं, त्याचा आढावा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत 8 हजार कोटींच पॅकेज रिलीज झालेलं आहे.
जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत 11 हजार कोटी रिलीज करायला मान्यता देण्यात आली. हे पैसे बजेटमधील नसल्याने विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. हे पैसे 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची असा आम्ही निर्णय घेतला. पुढच्या 15 ते 20 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होतील. 90 टक्के शेतकरी 15 ते 20 दिवसात कव्हर करण्याचा प्रयत्न करु. निधीची कमतरता उरलेली नाही. प्रोसेस आहे. दोनवेळा याद्या वॅलिडेट कराव्या लागतात. जसा पात्र सुटू नये, तसच अपात्र व्यक्तीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात रिवॅलिडेशन करावं लागतं” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं?
8 हजार कोटींच पॅकेज रिलीज केलं आहे. 11 हजार कोटींच आज रिलीज करतोय. थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. दुसरं असं आहे की, मोठ्या प्रमाणात शेत मालाच्या खरेदीचा विषय आहे. सगळीकडे रजिस्ट्रेशन सुरु करत आहोत. व्यापाऱ्याकडून हमी भाव मिळत असेल, तर शेतकऱ्यांनी त्याला माल विकावा पण कमी भाव मिळत असेल तर सरकाराला विकावा” असं आवाहन देवेंद्र फडणवीसयांनी केलं.
कुठल्या रेल्वे आराखड्याला मंजुरी?
“सरकारने आज तुळजापूर-सोलापूर-धाराशिव या सुधारित रेल्वे आराखड्याला मान्यता दिली आहे. 3295 कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. यात 50 टक्के पैसा राज्य सरकार आणि 50 टक्के केंद्र सरकार भरणार आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी राज्य सरकारने सुरु केलेली नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांना काय अपेक्षा?
आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्रचा पप्पू आहे असं प्रदर्शन करु नये. मी त्यांना महाराष्ट्र पप्पू म्हणणार नाही. राहुल गांधी जशी मोठी स्क्रीन लावतात. येरझाऱ्या घालतात खोदा पहाड, चुहा भी नही निकला असं असतं. काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा हेच केलं. त्यांची उत्तर निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी राहुल गांधी बनू नये” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


