भाजपनं अजित पवार, मुश्रीफांसह, भैय्या मानेंचे मनसुबे उधळले…
पुणे पदवीधर मतदार संघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपl रस्सीखेच सुरू आहे. अशातच भाजपने विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला.
त्यानंतर आता सांगलीचे पालकमंत्री अन् राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच लाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ताकाला जाऊन मोगा लपवण्यात काय अर्थ नाही, असे म्हणत मंत्री पाटील यांनी पुणे पदवीधरचे भावी उमेदवार असा शरद लाड यांचा उल्लेख करत एक प्रकारे उमेदवाराची घोषणाच केली. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित भाजप कार्यालय आणि पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुती मधील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे विद्यमान आमदार अरुण लाड आहेत. तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. भाजपच्या या जागेवर राष्ट्रवादीने आतापासूनच दावा केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने हा अश्वमेध सोडल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे भाजपकडून आमदार अरुण लाड व यांचे भाजपमध्ये घेऊन त्यांचे चिरंजीव शरद लाड यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता.
मागील दोन निवडणुकीचा निकाल काय?
पुणे पदवीधर मतदारसंघातून २०१४ दरम्यान झालेल्या निवडणुकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्यात लढत झाली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं आमदार अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. त्यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले. तर तर अरुण लाड यांना २५ हजार इतके मते मिळाली होती. अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. विशेषत: म्हणजे अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात बसला होता.
तर २०२० च्या पुणे पदवीधर मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदार अरुण लाड तर भाजपकडून संग्राम देशमुख अशी लढत झाली. लाड यांनी 1 लाख 22 हजार 145 मते घेतली. तर देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र होते. आमदार सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जयंत पाटील यांची मोठी ताकद लाड यांच्या मागे होती.


