सामना झाल्यावर सूर्याने या खेळाडूचं घेतलं नाव !
मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघात एकापेक्षा एक तगडे फलंदाज असताना १२५ धावांवर ऑल आऊट झाला. सगळे फलंदाज अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं, यामध्ये एकट्या अभिषेक शर्मा याने ६८ धावांची दमदार खेळी करत १०० पार करून दिली.
ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून १४ व्या षटकातच १२६ धावांचे लक्ष्य गाठत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामना संपल्यावर भारताच्या पराभवासाठी एका खेळाडूला जबाबदार पकडले आहे.
निश्चितच जोश हेजलवुडने उत्तम गोलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये जर तुम्ही चार फलंदाज लवकर गमावले तर पुनरागमन करणे खूप कठीण आहे. त्यांना श्रेय दिले पाहिजे, त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली असं सूर्यकुमार यादव म्हणाला. या विधानावरून हे स्पष्ट होते की, हेजलवुडच्या गोलंदाजीचा भारतीय संघावर मोठा प्रभाव पडला आणि संघाला सावरणे कठीण झाले.
केवळ एका खेळाडूला दोष देणे योग्य नाही, तर संघातील अव्वल चार फलंदाजांची कामगिरी या पराभवाला कारणीभूत ठरली. विशेषतः, पॉवरप्लेमध्येच तीन बळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारतीय संघाची अवस्था बिकट झाल्याचं सूर्या म्हणाला.
दरम्यान, या सामन्यात भारताकडे बचाव करण्यासाठी पुरेसे धावांचे लक्ष्य नव्हते. भारताने ६ गडी बाद केले असले तरी, कारण केवळ १२५ धावा होत्या. अशा परिस्थितीत गोलंदाजांचे मनोधैर्य खचले होते आणि ऑस्ट्रेलियानेही सामना फार कठीण होऊ दिला नाही. त्यांनी सामना लवकर संपवण्यासाठी काही विकेट गमावल्या. आता मालिकेतील तिसरा सामना होबार्ट येथे २ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग 11- मिच मार्श (C), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.
भारताचा प्लेइंग 11 – अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (C), तिलक वर्मा, संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.


