‘या’ पदांसाठी निघाली भरती; परीक्षा नाही अन्…
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) कडून सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. NMDC कडून विशेषत: फ्रेशर्स तरुणांसाठी अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.
या भरतीच्या माध्यमातून एकूण 197 तरुणांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. संबंधित क्षेत्रात अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
या अप्रेन्टिसशिपमध्ये पात्रतेच्या आधारे उमेदवारांची तीन विभागांत नियुक्ती केली जाणार आहे. ट्रेड अप्रेन्टिस, ग्रॅज्युएट अप्रेन्टिस आणि टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेन्टिस या तीन विभागांत उमेदवारांची निवड केली जाणार आहे. NMDC ही देशाची प्रमुख कंपनी असून यामध्ये अप्रेन्टिसशिपच्या माध्यमातून उमेदवार चांगला अनुभव मिळवू शकतील.
पात्रता आणि वयोमर्यादा
या अप्रेन्टिसशिपमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं संबंधित क्षेत्रात शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. ट्रेड अप्रेन्टिसमध्ये नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे NCVT किंवा SCVT मधून मान्यताप्राप्त आयटीआय सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसेच, ग्रॅज्युएट अप्रेन्टिस पदासाठी इंजीनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी विषयात ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी असणं आवश्यक आहे. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेन्टिसमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा असणं अनिवार्य आहे. यासोबतच, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी 16 वर्षे किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.
कशी होणार निवड?
NMDC च्या या भरतीसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित केला जाईल. याचा अर्थ अर्ज केल्यानंतर, उमेदवारांनी नियोजित तारखेला निश्चित ठिकाणी मुलाखतीसाठी उपस्थित राहणं आवश्यक आहे. या अप्रेन्टिसशिप पदांसाठी सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मुलाखती घेतल्या जातील आणि प्रत्येक ट्रेडसाठी मुलाखतीची तारीख वेगळी असणार आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय केवळ इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल.
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया
उमेदवारांना इंटरव्ह्यूच्या दिवशी एक गूगल फॉर्म भरावा लागेल आणि नंतर सर्व कागदपत्रांसोबत निश्चित केलेल्या ठिकाणी हजर राहावं लागेल.
कोणते डॉक्यूमेंट्स आवश्यक ?
अपडेटेड रेझ्युमे
पासपोर्ट साइझ फोटो
जन्माचा दाखला
जातीचा दाखल (लागू असल्यास)
आयटीआय/ डिप्लोमा/ पदवीचं मूळ प्रमाणपत्र आणि फोटो


