युक्रेनच्या दाव्यामुळे.डोनाल्ड ट्रम्प यांचेही टेन्शन वाढले ?
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही चालूच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या अनेक दिवसांपासून या युद्धावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र अजूनही यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. रशियाकडून अमेरिकेवर जोरदार हल्ले सुरूच आहे. असे असतानाच आता रशियाच्या युद्धनीतीचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रशियाच्या या कृत्यामुळे आता संपूर्ण जगाचीच चिंता वाढली आहे. रशियाचे युद्धासंदर्भातील आक्रमकपणाच यातून स्पष्ट होतोय असे म्हटले जात आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा यांच्या दाव्यानुसार रशियाने युकेनवर गेल्या काही महिन्यात सर्वात घातक असणाऱ्या 9M729 क्षेपणास्त्राने हल्ले केले आहेत.
नेमका दावा काय आहे?
सिबिहा यांच्या दाव्यानुसार अलिकडच्या काही महिन्यांत रशियाकडून 9M729 क्रुझ क्षेपणास्त्राचा उपयोग अनेकवेळा करण्यात आला आहे. याच क्षेपणास्त्राच्या निर्मितीमुळे अमेरिकेने 2019 साली रशियासोबतच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून (INF करार) माघार घेतली होती. रशियाकडून 9M729 क्रुझ क्षेपणास्त्राचा वापर केल्याचे पहिल्यांदाचा एखाद्या अधिकाऱ्याने अधिकृतपणे सांगितले आहे.
9M729 क्षेपणास्त्र नेमके काय आहे?
9M729 हे एक ग्राऊंड-लॉन्च क्रुझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र किंवा पारंपरिक वॉरहेड वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्राची रेंज साधारण 2500 किमी असल्याचे बोलले जाते. म्हणजेच हे क्षेपणास्त्र युरोपातील कोणत्याही भागाला लक्ष्य करू शकते. 2019 साली अमेरिकेने या क्षेपणास्त्रावर आक्षेप व्यक्त केले होते. या क्षेपणास्त्राची निर्मिती म्हणजे अण्वस्त्र नियंत्रण कराराचे उल्लंघन आहे, अशी भूमिका घेतली होती. नियमानुसार हे क्षेपणास्त्र तयार करताना त्याची रेंज फक्त 500 किमीच असावी, असे अण्वस्त्र नियंत्रण करारात नमूद होते. रशियाने हा नियम मोडला आहे, असा अमेरिकेचा दावा होता. त्यामुळेच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबच्या या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
रशियाने मिसाईलचा केला 23 वेळा वापर
रॉयटर्सच्या वृत्तानुसार युकेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या क्षेपणास्त्राच्या वापराबाबत काही दावे केले आहेत. या दाव्यांनुसार रशियाने ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात 9M729 या क्षेपणास्त्राचा एकूण 23 वेळा वापर केला आहे. याआधी 2022 सालीही रशियाने एकूण दोन वेळा या क्षेपणास्त्राचा वापर केला होता. सर्वात अलिकटचा हल्ला हा 5 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या हल्ल्यात रशियाच्या 9M729 या क्षेपणास्त्राने एकूण 1200 किमी अंतर पार करत युक्रेनच्या लापाइक्वा गावातील इमारतींना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात एकूण चार जणांचा मृत्यू झाला होता.
युरोप, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
दरम्यान, रशिया अण्वस्त्र नियंत्रण कराराचे उल्लंघन करून युक्रेनवर हल्ला करत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र युक्रेनच्या अशा वागण्यामुळे ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश येत नाहीये. त्यामुळे एका प्रकारे ट्रम्प यांच्याही चिंतेत भर पडल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे डोनाल्ड ट्रमप 2019 सालाप्रमाणेच एखादा निर्णय घेणार का? असे विचारले जात आहे. रशियाच्या अशा भूमिकेमुळे फक्त युक्रेनच नव्हे तर संपूर्ण युरोपीच चिंता वाढल्याची भावना व्यक्त केली जात असून युद्ध कधी थांबवणार? असाही सवाल केला जात आहे.


