एकवेळच्या जवळच्या मित्राने राज ठाकरेंबद्दल वापरले बोचरे शब्द !
आज मनसे आणि महाविकास आघाडीने सत्याचा मोर्चा आयोजित केला आहे. मनसे आणि मविआकडून मतचोरीचा आरोप होतोय. दक्षिण मुंबईतील सीएसटी परिसरात हा मोर्चा सुरु आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या सत्याच्या मोर्चावर खोचक टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या लोकल प्रवासावरही त्यांनी बोचरी टीका केली. “याद्यांमध्ये चूक असेल तर दुरुस्ती झाली पाहिजे आणि हे सुरू असतं. मात्र त्या मागे भावना ही मतदार यादी नसून मिळणारे अपयश आहे. पराभवाची कारण हे मतदार याद्या असाव्यात यासाठी हे केलं जातं आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हेच evm होते. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता विरोधी पक्षावर आलीय. नौटंकी करण्यापेक्षा काम केलं पाहिजे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
“एकी आहेत म्हणतात, एकी आहे का? मग, सर्वांचीच तोंडे वेगवेगळी आहेत. मारून मिसळून आणलेले आणि गोंधळलेले विरोधक आहेत” असं दरेकर म्हणाले. राज ठाकरेयांच्या लोकल प्रवासावर सुद्धा दरेकर यांनी टीका केली. “लोकलने तर सर्वसामान्य लोकं दररोज प्रवास करतात. यात वेगळं काही नाही, किमान लोकांच्या समस्या तरी त्यांना समजतील. जगावेगळं काही त्यांनी केलय, असं मला वाटत नाही. सत्य हे पर्मनंट असायला हवं, असत्याची पाठराखण करायची आणि नाव सत्याचा मोर्चा हे बरोबर नाही” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
एकवेळचा विश्वासू मैत्री
प्रवीण दरेकर हे एकवेळचे राज ठाकरे यांचे विश्वासू आणि जवळचे मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून दोघे एकत्र आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते. ते मनसेच्या तिकीटवर मागाठणे विधानसभा मतदारसंघातून एकदा आमदारही राहिले आहेत.
संभ्रमावस्थेत असलेला विरोधी पक्ष
भाई जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली. प्रदेशाध्यक्ष यांची वेगळी भूमिका आहे. संभ्रमावस्थेत असलेला विरोधी पक्ष आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले. सिकंदर शेख अटक प्रकरणावर दरेकर म्हणाले की, “पोलीस योग्य काय आहे ते प्रकरण जाणून घेतील. त्यानंतरच कारवाई होईल. पण जर कोणी गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होऊ नये अशी आमची भूमिका असेल.


