माझी आणि आरोपींची एकावेळी…
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. धनंजय मुंडे यांनी माझी अडीच कोटींना सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा जरांगे यांनी केलाय.
त्यासोबतच राज्यातील अनेक नेत्यांच्या गाडीमध्ये छुप्या पद्धतीने मोबाईल आणि काहींची घरी कॅमेरेही लावल्याचंही जरांगे म्हणाले होते. मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांचे आरोपींसोबतच झालेले बोलण्याचे रेकॉर्डिंग आपल्याकडे पुरावा असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांच्या या सर्व आरोपांना धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.
आता ज्या कोणाला अटक झाली ते गेस्ट हाऊसवर येऊन भेटले असतील. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचे, कबुली देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप माझ्यावर करतायेत. मा त्यांना केलेल्या प्रश्नावर बोलायची तयारी नाही, माझी मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने नाहीतर सीबीआयने करावी. ब्रेनमॅपिंग आणि नार्कोची टेस्ट करू आता अति झालं, सत्य काय आहे ते समोर येऊद्या जरांगे बोलतात माझं फोनवरून बोलणं झालं, माझा फोन २४ तास चालू असतो. कोणी मला केला आणि मी बोललो तर मी त्यांना संपवण्याच्या अर्थाने बोललो का? या गोष्टी महागात पडणार आहेत. कर्मा रिपिट्स, जेवढं खोटं कराल तेवढं तुमच्याविरोधात फिरेल, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न, गरिबांसाठीच माझं जीवन आहे. जरांगे मला ऑन इयर मारण्याची धमकी देतात. याला ब्रेन मॅपिंग नार्को आणि सीबीआय चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांना सांगणार त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांच्याविरोधात कोणी बोललं की त्यांना मारहाण, दादागिरी कोणाची चालू आहे. त्यामुळे अशा खोट्या केसेस करून बहुजन समाजाचा कार्यकर्ता मागे हटणार नाही. माझ्या आई-वडिलांनी कोणाला पूढे करून संपवायचं शिकवलं नाही, विनाकारण असले खोटारडे आरोप करून जीवनातून उठवायचा प्रयत्न करू नका, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
माझ्या दोन प्रश्नांची आतापर्यंत मिळाली नाहीत. मराठा समाजाला खरंच ओबीसीमध्ये जाऊन फायदा आहे की EWS मध्ये जाऊन फायदा आहे. जनेतसमोर होऊन जाऊद्या, फायदा कुठे आहे? सख्खे भाऊ असले पण जरांगेंच्या विचाराचा असला तर बोलत नाहीत. आपल्याला त्या ठिकाणी आता घडी बसवावी लागेल.जरागेंनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं ओबीसी की EWSमध्ये आरक्षण जास्त मिळतं.


