जुहू रूग्णालयात दाखल केलं अचानक…
बॉलिवूड अभिनेता गोविंदा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी त्या दोघांच्या नात्याबद्दल विविध खुलासे करताना दिसत आहे. हेच नाही तर एका मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे अफेअर सुरू असल्याची तूफान चर्चा आहे.
यादरम्यानच गोविंदाला अचानक जुहूच्या क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. चक्कर येऊन गोविंदा बेशुद्ध झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळतंय. गोविंदा धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रूग्णालयात गेला होता. धर्मेंद्र गोविंदाला मुलगा मानत असल्याने प्रकृती नाजूक असल्याचे कळताच गोविंदा धर्मेंद्र यांना बघण्यासाठी रूग्णालयात गेला होता. आता गोविंदाला रूग्णालयात दाखल केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गोविंदावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय. गोविंदाला चक्कर आल्याने तो बेशुद्ध झाला होता. हेच नाही तर त्याला बेशुद्ध अवस्थेतच रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या गोविंदाची तब्येत स्थिर असल्याची माहिती पुढे येतंय. पुढील काही तास गोविंदावर उपचार केले जातील. काही दिवसांपूर्वीच याच रूग्णालयात गोविंदाला पायाला गोळी लागल्याने दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता परत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोविंदाचे वकील बिंदल यांनी याबद्दलची पुष्टी केली आहे. मागील काही दिवसांपासून गोविंदाची पत्नी अर्थात सुनीता आहुजा या दोघांच्या नात्यावर सतत भाष्य करताना दिसत आहेत. हेच नाही तर पुढच्या जन्मात गोविंदा आपल्याला पती नको, असेही त्यांनी म्हटले. सातत्याने सुनीता यांच्याकडून गोविंदावर गंभीर आरोप केली जात आहेत. गोविंदा आपल्याला पैसे देत नसलयाचेही त्यांनी म्हटले होते.
गोविंदाच्या अफेअरबद्दलही सुनीता यांनी थेट भाष्य केले होते. सुनीता यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, जोपर्यंत मी स्वत: गोविंदाला रंगेहात पकडणार नाही. तोपर्यंत मी यावर काही बोलणार नाही. मी देखील त्याच्या अफेअरबद्दल ऐकत आहे. शेवटी काही असल्याशिवाय उगाच चर्चा नाही सुरू होत. पण मी त्याला रंगेहात पकडेल आणि तेव्हाच बोलेल असे सुनीता यांनी म्हटले होते. त्यामध्ये आता अचानक गोविंदाला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.


