मैथिली ठाकूर किती कमावते; संपत्तीचा आकडा पाहाचं…
बिहारमधील मधुर सुरांची राणी, गायिका मैथली ठाकुरने आपली राजकीय कारकीर्द दणक्यात सुरु केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून मैथिलीने विजय मिळवत अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेत एन्ट्री केली आहे.
आपल्या गोड आवाजानं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या मैथिलीने वयाच्या 25 व्या वर्षी मिळवलेले हे यश नेत्रदिपक आहे. आपल्या आवाजाने वेड लावणारी मैथिली महिन्याला किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर वाचा…..
वडिलांकडून बालकडू:
मैथिली ठाकुरचा जन्म बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील बेनिपट्टी येथे झाला. मैथिलीचे वडीलरमेश ठाकूर स्वतः संगीत शिक्षक आहेत, त्यांच्याकडूनच तिने लहानपणापासूनच लोक आणि शास्त्रीय संगिताचे शिक्षण मिळाले. मैथिलीचे दोन भाऊ, रिशव आणि आयाची, तबला आणि हार्मोनियम वाजवतात. सुरुवातीला हे तिघे मिळून घरात व्हिडिओ रेकॉर्ड करून यूट्यूबवर (YouTube) अपलोड करत होते. हळूहळू या व्हिडिओंनी लोकांचे लक्ष वेधले आणि मैथिली यांचे नाव घराघरात पोहोचले.
राईझिंग स्टारने दिली नवी ओळख
मैथिली ठाकुरला २०१७ मध्ये कलर्स वाहिनीवरील ‘राईझिंग स्टार’ (Rising Star) या शोमधून खरी ओळख मिळाली. या शोमुळे तिच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. यानंतर मैथिलीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर परफॉर्म करण्याची संधी मिळाली. तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राष्ट्रीय क्रिएटर्स अवॉर्डने सन्मानित केले आहे. मैथिलीने भोजपुरी आणि हिंदी गाण्यांची अशी सांगड घातली की, त्यामुळे तरुणाई लोकसंगीताशी जोडली गेली. तिच्या आवाजातील पारंपारिक गोडवा आणि त्यांची आधुनिक शैली यामुळे यूट्यूबवर त्यांच्या व्हिडिओंना कोटींमध्ये व्ह्यूज मिळतात.
मैथिली ठाकुरची कमाई किती?
मैथिली ठाकूर यांची कमाई मुख्यत्वे तिचे लाईव्ह कार्यक्रम आणि यूट्यूब या दोन माध्यमातून कमाई होते. मैथिली एका शोसाठी ५ ते ७ लाख रुपये इतके शुल्क आकारते. महिन्याला ती जवळपास 10 ते १२ शो करते. कार्यक्रम आणि युट्यूबमधून ती दर महिन्याला ५० लाख ते ९० लाख रुपये कमावते. मैथिलीने निवडणूक उमेदवारी अर्जात तिच्या संपत्तीची माहिती दिली आहे.
एकूण संपत्तीचा आकडा
मैथिलीकडे तब्बल 1.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि वाहनं असल्याचे तिने नमुद केले आहे. तसेचतिच्याकडे 1.80 लाख रुपयांची रोख रक्कम आहे. दरम्यान, राजकारणात प्रवेश केल्यानंतरही संगीत हीच आपली खरी ओळख राहील, असे मैथिली ठाकूरने स्पष्ट केले आहे. “संगीत माझा श्वास आहे आणि आज जी काही कमाई आहे, ते माझ्या कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे, असं ती म्हणते.


