पुण्यात गेल्या दिवसांपूर्वी एक भीषण अपघाता झाला.या अपघातमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरले. या दुर्घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती.
यात आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेते धनंजय कोळी (वय 30) यांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या या मोठ्या अपघातात दोन जड वाहने एकमेकांना धडकले होते. धडकल्यानंतर धनंजय यांच्या कारची चेंगराचेंगरी झाली. कार दोन वाहनांच्या मधोमध आली आणि याच दरम्यान गाडीचा चुराडा झाला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, धनंजय यांला 3 महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता. अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी आणि बाळ लातूर येथे होते, तर ते स्वतः पुण्यात आई-वडिलांना भेटण्यास येत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे रहिवासी असलेले धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात राहत होते.
सहा महिन्यांपासून ते वाहतूक व्यवसायात कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी खाजगी कंपनीत नोकरी केली होती. रंगभूमीवर काही नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या, तर सोशल मीडियावर त्यांनी स्वतःला ‘अभिनेता’ अशी ओळख दिली होती.
या दुर्घटनेमुळे कोळी यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला पोरकं केल्याने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. नवले ब्रीज हा अपघाताचा स्पॉट झाला आहे त्यामुळे पुणे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


