प्रतिनिधी – स्वाती हडकर
लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई चव्हाण यांनी कलबस्ते येथील बुथ क्रमांक २७, गणामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रात त्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या असता त्यांनी शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केले.
यावेळी बुथ अध्यक्ष दर्शन चव्हाण यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. मतदान केंद्रावर सुरळीत व्यवस्था असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
