डोणगाव प्रतिनिधी सालार बेग
11/02/2026
डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा, अंजनी बु! येथे आज वार्षिक महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. .
वार्षिक महोत्सवात नृत्य, गायन, नाट्य सादरीकरण, भाषणे व विविध कला सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सादर केली. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते असे उद्गार बुलढाणा जिल्हा कृषी पशुसंवर्धन सभापती माननीय राजेंद्रजी पळसकर यांनी केले, वार्षिक महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनच नव्हे तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवी ऊर्जा व आत्मविश्वास मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले असे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी सांगितले .
सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण तसेच सर्जनशील विचारसरणी विकसित होते. अभ्यासासोबतच अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा मानसिक व बौद्धिक विकास होतो, असे मत प्रमुख पाहुणे प्राध्यापक रियाज उलहक व्यक्त केले.
वार्षिक महोत्सवातील हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सुबोध सावजी बुलढाणा जिल्हा कृषी पशुसंवर्धन सभापती
राजेंद्र पळसकर ,
संस्था अध्यक्ष
बशीर अहमद शेख ,
रियाजूल हक (IIFS) संस्थापक आसिफ खान समाजसेवक अबरार खान मिल्ली पत्रकार,
जावेद खान ठेकेदार समाजसेवक सोहेल सौदागर सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद जाहिद मोहम्मद हयात संचालक माझी ग्रामपंचायत सदस्य.मोहम्मद बागवान जावेद खान जामु खासाब
ऍड. चव्हाण.शरीफ खान फय्युम मुल्लाजी
हमिद शाह रफिक अतार जावेद शाह ठेकेदार युसुफ आतार
वसीम अब्दुल. मोहम्मद जमील मोहम्मद हयात अब्दुल जफर राजीक मेकनिक
अशपाक भाई यासिन खान तौकीर अली ठेकेदार प्रस्ताविक मुख्याध्यापक मोहम्मद सलाहुद्दीन शेख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसीन खान यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचे समारोप शिक्षिका शिक्षिका नगमा परवीन मोहम्मद अझरुद्दीन यांनी केले यांच्यासह आदी उपस्थित होते
