दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मंनधरणे
दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमिवर आदर्श विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या हर्षोल्हासात पार पडला असून स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी सादर करण्यात आलेल्या भन्नाट नृत्यप्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आदर्श विद्यालयात दरवर्षीप्रमाणे संस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालक माता पित्यांसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शाळा परिसरात यासांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी शाळेच्या संचालिका गायकवाड मॅडम व पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी, केंद्रप्रमुख कुराडे मॅडम, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मन्यार सर
यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाळा प्रशासनाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नंतर चिमुकल्यांच्या नृत्यप्रदर्शनास सुरूवात करण्यात आली. दरम्यान स्वतःचे नावही न सांगता येत असलेल्या चिमुकल्यांनी अनेक बहारदार गितांवर आपल्या भन्नाट कलागुणांचे प्रदर्शन करताना अप्रतिम नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.. तर अनेक चुटकुले व छोट्या नाटिकांतून भौतिक व सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडविले. सुत्रसंचालन शिक्षिक टिपराळे सर यांनी केले. त्यावेळी संस्थेचे सचिव गायकवाड मॅडम आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबाटे सर, मुख्याध्यापक टिपराळे सर , मुख्याध्यापिका कांबळे मॅडम ,सहशिक्षक पांचारे सर, मुख्याध्यापक बिरादार सर राजश्री शाहू चे मुख्याध्यापक जाधव सर, बोडके सर, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास अंबाटे , सातारे, वझरकर , सोनकांबळे , मनियार मॅडम,शेख, तसेच शाळेचे सर्वशिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास अंबाटे यांनी सर्व उपस्थित पत्रकार बांधव पालक व मान्यवरांचा आभार मानला.
