पिंपरी चिंचवड प्रतिनिधी -बद्रीनारायण घुगे
वडमुखवाडी येथील श्री.संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव हा परिसरातील नागरिक, युवक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा क्रीडा उपक्रम आहे. सदर जलतरण तलावाचे संचालन ठेकेदारामार्फत करण्यात येत असताना अलीकडील काळात विविध बाबींमध्ये गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
तलाव परिसरातील स्वच्छतेचा अभाव, पाण्याच्या गुणवत्तेबाबत योग्य ती काळजी न घेणे, वेळापत्रकाचे पालन न करणे, प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांची अपुरी उपलब्धता तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न करणे या बाबींमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.
म्हणून आपण संबंधित ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन सदर बाबींची चौकशी करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी. या संदर्भात आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
महापौर श्री.नितीनआप्पा काळजे यांनी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार खोराटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
