दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा अर्धापूर – प्रतिनिधी मन्मथ भुस्से
तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या परीक्षा पॅड (Exam Pad) चे मोफत वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम साई कॉम्प्युटर, अर्धापूर यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनसामग्रीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे हा आहे.
सदर उपक्रम साई कॉम्प्युटर अर्धापूरचे संचालक श्री. नागेश खरसकर यांच्या संकल्पनेतून साकारत असून, हा कार्यक्रम आदरणीय आमदार दीदी यांच्या शुभहस्ते पार पडावा, अशी आयोजकांची मनापासून इच्छा आहे. या कार्यक्रमांतर्गत काही निवडक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आमदार दीदी यांच्या हस्ते परीक्षा पॅड वितरित करण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या साई कॉम्प्युटर अर्धापूरकडून यापूर्वीही विविध उपक्रम राबविण्यात आले असून, सदर उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवी दिशा मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय अर्धापूर येथील विद्यार्थ्यांना exam pad देण्यात आले आहे.
हा उपक्रम समाजोपयोगी व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा असल्याने, सर्व स्तरातून त्याचे स्वागत होत आहे.
