मालेगाव प्रतिनिधी लकी रोकडे जैन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव शहरात १९ फेब्रुवारी रोजी प्रचंड शोभायात्रा काढण्यात येणार असून या शोभायात्रेत सर्व जाती – धर्मातील शिवप्रेमी, शिवभक्तांनी हजारोच्या संखेने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर, संपूर्ण भारतीयांचे दैवत आहेत. त्यांनी सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या सारखा आदर्श राजा जगातही झाला नाही. त्यामुळे
त्यांची महती संपूर्ण जगाने मान्य केली अशा या चारित्र्यवान व सर्वगुणसंपन्न राजांची जयंती १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. मालेगांव शहरात सुध्दा सार्वजनिक शिवजयंती आयोजन समितीच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून साजरी होत आहे. त्या निमित्ताने या वर्षी सुद्धा १९ फेबुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्या निमित्ताने मालेगाव शहरामधुन भव्य शोभायात्रा काढली जाणार असून त्यामधे
शहरातील प्रत्येक शाळेतील आपापल्यातील कलागुण सादर करणार आहेत. विद्यार्थी
यावेळी लेझीम, लाठीकाठी, पोवाडे, लघुनाट्य, पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत. अनेक शाळेतील विद्यार्थी सजवलेल्या टॅक्टरवर, घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज, मॉ जिजाऊच्या वेषभुषा सादर करणार आहेत. तसेच छोटे छोटे वारकरी आपल्या वेषात दिंडीमधे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. या शोभायात्रेत सर्व धर्मिय शिवप्रेमीनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
