दै, चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी किशन वडारे
———————————–
चाकूर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी चाकूर पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेत ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्यामाहितीनुसार दि. १५ रोजी सकाळी उमरगा कोर्ट ते नांदूरा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ समशुद्दीन महमूद शेख (वय ३३, रा. दर्गापूरा गल्ली, अहमदपूर) हा एमएच ०३ एवाय ८६०६ क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरून केसरयुक्त ‘विमल पान मसाला’ व ‘व्ही-१ टोबॅको’ असे लिहिलेल्या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत असताना चाकूर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून प्रत्येकी २०० पुडे असा ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.तसेच २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल व १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस अमलदार चंद्रशेखर डिगोळे यांच्या फिर्यादीवरून गुरनं ७८/२०२६ कलम १२३,२७४,२७५,२२३ बीएनएसनुसार समशुद्दीन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दामोदर सिरसाठ करीत आहेत.
