दै.चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कंधार तालुक्यातील शिराढोण येथील आयुर्वेदिक दवाखाना येथे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सत्यनारायण मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोज शनिवार ह्या दिवशी सुवर्णप्राशन संस्कार व आरोग्य तपासणी शिबिर शासनाच्या आदेशानुसार यशस्वीरित्या पार पडले. या
शिबिरा दरम्यान नागरिकांची सांसर्गिक तसेच असांसर्गिक आजारासंबंधी तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.नागरिकांची आवश्यकतेप्रमाणे रक्त ,शर्करा व इतर रक्त तपासणी करण्यात आली. सुवर्णप्राशन संस्काराचा बालकांना होणाऱ्या फायद्याबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी सहा महिन्यापासून ते पाच वर्षा पर्यंतच्या बालकांना सुवर्णप्राशन पाजण्यात आले. व १३५ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण दुलेवाड, शिराढोण येथील आयुर्वेदिक दवाखाना येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप तिब्बे, स. आ. अधिकारी डॉ. बालासाहेब निखाते, स. आ. अधिकारी डॉ. प्रियंका देशमुख, फार्मासिस्ट श्री नरसिंग सुंकावार, आरोग्य सेविका श्रीमती घंटेवाड, आरोग्य सेवक, आशा व परिचर यांनी मेहनत घेवून हे शिबिर यशस्वी केले.
