चालू वार्ता वृत्तसेवा अर्धापूर- प्रतिनिधी मन्मथ भुस्से. अर्धापूर दि.१ ता.प्र.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील संशोधन क्षेत्राकडे आवड आणि संधी म्हणून पहावे असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पुणे येथील पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो असलेल्या डॉ.गीता खराबे यांनी केले. ते अर्धापूर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे विज्ञान दिनानिमित्त (दि.२८) रसायनशास्त्र विभागाच्यावतीने विविध उपक्रम व व्याख्यानात आभासी स्वरूपात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अजय टेंगसे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विक्रम कुंटूरवार, डाॅ. मंगेश पोतंगले, डाॅ. पूजा फुलारे, डाॅ. किरन कळणे यांची उपस्थिती होती. डॉ.खराबे यांचे संशोधन क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे तसेच त्यांना नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे व एसीएसआयआर कडून देखील बेस्ट थिसिस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विज्ञान क्षेत्रातील विविध परीक्षा व संधी बद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.अजय टेंगसे म्हणाले की विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वाटचाल करावी, नव्या उमेदीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे मार्गदर्शन केलेयावेळी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी वनस्पतीशास्त्र व रसायनशास्त्र विभागाकडून घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे बक्षीस वितरणही करण्यात आले यावेळी विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय प्रा.पूजा फुलारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.मंगेश पोतंगळे यांनी केले तर आभार प्रा.किरण कळणे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
