दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
कोथळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेवाडी (कोथळे) येथील शिक्षक लक्ष्मण भिमाशंकर भिंगे यांना पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
भिंगे यांनी अध्यापनात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन करून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळाली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार अकलूज येथील स्मृती भवन येथे तालुक्याचे आमदार मा. उत्तमराव जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. तसेच पंचायत समिती माळशिरसचे पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल लक्ष्मण भिंगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
