भोंदू अशोक खरात प्रकरणात एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अनेक नेत्यांसोबत अशोक खरात याचे नाव जोडले जात आहे. राज्यात महत्वाच्या नेत्यांचे अशोक खरातचे जवळचे संबंध असल्याचे कळतंय.
यादरम्यान काही फोटोही व्हायरल झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळ उडवारा खुलासा केला. एका अनोळखी व्यक्तीने आपल्या सीडीआर दिला असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांचे फोन कॉल झाल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. हेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, याप्रकरणात सविस्तर चाैकशी करणार. अशाप्रकारे कोणीही सीडीआर देऊ शकत नाही. सीडीआर देणाऱ्याची चाैकशी होईल. यावर आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी आरोप केले. काहींना थेट अंजली दमानिया यांचीच चाैकशी करा, असे म्हटले.
संजय राऊत यांनीही म्हटले होते की, अंजली दमानिया काही रॉ एजंट नाहीत, त्यांच्याकडे सीडीआर यायला. यासर्व चर्चांवर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, मला माहिती होते की, मी हे सीडीआर पुढे आणल्यानंतर माझ्यावर अशाप्रकारचे आरोप होणार आहेत. मी पूर्ण तपासले. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही. उदय सामंत एकही कॉल नाही.
भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकही कॉल नाही. अब्दुल सत्तार, रामदास कदम, योगेश कदम, राधाकृष्ण विखे पाटील, सुषमा अंधारे, संजय राऊत, बच्चू कडू, राम कदम, प्रसाद लाड यापैकी एकाचाही कॉल नाही. यासोबतच अंजली दमानिया यांनी राज्यातील अनेक नेत्यांची नावे घेतली. मी सर्व नंबर तपासले आणि क्रॉस केले.
आम्ही लढतो तो विषयांवर फालतूचे राजकारण करत नाही. मिलिंद नार्वेकर यांचे नाव आले, त्यांचा 8 कॉल आहेत. मग तुम्ही मागणी केली, त्यांच्या कॉलची? काय बोलता तुम्ही अंधारे बाई?… मुळात लढायचे कोणाविरोधात खरात विरोधात.. मी जराशी माझ्याकडे आलेली माहिती दिली की, लगेचच वरखाली झाले. रूपाली चाकणकर, सुनील तटकरे यांचे किती फोन कॉल झाले हे सांगताना अंजली दमानिया दिल्या.
पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, माझ्याकडे आलेली माहिती फक्त मी दिली. माझ्याकडे जी माहिती आहे ती 1 एप्रिल 2026 ते 25 मार्च 2026 पर्यंतची आहे. शिवसेनेच्या शिंदेंचे 17 कॉल आलेत. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर यांचेही मला कॉल मिळाले. यादरम्यान चाकणकरांचे खरात यांच्यासोबतच कॉल पुरावे, दमानिया यांनी दाखवले.
