दि. 05/04/2026 रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी (पुणे) येथे युवा प्रभोधन साहित्य मंच व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तसेच बंडखोर साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय “युवा संकल्प महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा 2026” हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास कार्यक्रमाध्यक्ष म्हणून सन्माननीय विशालजी लोंढे सर (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे), उद्घाटक म्हणून आ. शैलेंद्र चव्हाण सर (अध्यक्ष, RPI पुणे शहर), तसेच स्वागता अध्यक्ष मा. संतोषदादा वाकोडे सर यांच्यासह मा. डॉ. दत्ता कोहीनकर सर, शिवव्याख्याते संपतराव गारगोटे सर, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, प्रभोधनकार सागरभाऊ वाघमारे, कवी जितेन सोनवणे, साहित्यिका विना कडु, वृषाली विरगुरजर, ज्योतीताई गायकवाड, दिलीप पालवे, विनोदजी हीवराळे, सुरेखाताई पालवे, वैशालीताई बढोदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
या सर्व मान्यवरांच्या साक्षीने आणि प्रेरणादायी वातावरणात मला राज्यस्तरीय “संविधान योद्धा 2026” हा मानाचा पुरस्कार सन्माननीय विशालजी लोंढे सर यांच्या हस्ते प्राप्त झाला, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची आणि आयुष्यभर लक्षात राहणारी क्षणिकता आहे.
हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मित्रपरिवाराचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्या कुटुंबियांचा आहे. आपण दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो.
यापुढेही संविधान मूल्यांची जपणूक करत, समाजसेवेच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करतो…!
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या…
धन्यवाद…!
