रशियाने देशांची यादीच केली जाहीर; लिस्ट पाहून युरोपमध्ये खळबळ…
युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक यादी जाहीर केली आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या यादीत ब्रिटन, जर्मनी, डेन्मार्क यांच्या नावाच उल्लेख आहे.
रशियाने ज्या देशांवर संभाव्यपणे हल्ले केले जाऊ शकतात, त्यांची यादी जाहीर केली असून, यामध्ये युरोपातील अनेक मोठ्या देशांचं नाव आहेत. या देशांमध्ये युक्रेनला देण्यासाठी ड्रोनची निर्मिती केली जात असल्याचा रशियाचा दावा आहे.
यादीत कोणत्या देशांचा समावेश?
रशियाच्या यादीत जर्मनी, डेन्मार्क, लातविया, लिथुआनिया, नेदरलँड, पोलंड और आणि चेक रिपब्लिकमध्ये ड्रोनची निर्मिती कऱणाऱ्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय जर्मनी, स्पेन, इटली, चेक रिपब्लिक, इस्रायल आणि तुर्की येथे ड्रोनचे सुटे भाग बनवणाऱ्या फॅक्टरींचाही समावेश आहे.
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे डेप्युटी हेड दिमित्री मेदवेदेव यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत धमकीवजा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केलेलं विधान जसंच्या तसं घेतलं पाहिजे. ज्या युरोपीय ठिकाणांवर ड्रोन आणि इतर उपकरणांचे उत्पादन केलं जात आहे, जाते, अशा तळांचा समावेश रशियन सशस्त्र दलांच्या संभाव्य लक्ष्यांच्या यादीत करण्यात आला आहे. हे हल्ले प्रत्यक्षात कधी उतरणार, हे पुढे काय घडतं यावर अवलंबून असेल. युरोपीय मित्रांनो, निवांत झोपा!
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, युक्रेनसाठी ड्रोनचं उत्पादन वाढवण्याचा युरोपिअन देशांचा निर्णय हे विचार करुन उचललेलं पाऊल आहे. यामुळे संपूर्ण युरोपीय खंडातील लष्करी-राजकीय परिस्थिती चिघळेल आणि हे देश हळूहळू युक्रेनचे धोरणात्मक ‘रियर एरिया’ ठरतील.
युक्रेनसाठी युरोपात तयार होणाऱ्या ड्रोनचा वापर करत रशियावर हल्ला केल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील असा इशारा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. युरोपीय देशांची सुरक्षा बळकट करण्याऐवजी, युरोपीय नेत्यांच्या कृती या राष्ट्रांना रशियासोबतच्या युद्धाच्या दिशेने वेगाने ढकलत आहेत असंही रशियाने म्हटलं आहे.
