मोदींच्याच हाती खरी ताकद; प्रसिद्ध लेखकाने सांगितला पडद्यामागचा खरा खेळ !
रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारताची भूमिका महत्त्वपूर्ण बनली असल्याचे कियोसाकीने म्हटले असून आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अलीकडील संभाषणाचा दाखला दिला.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोन कॉलने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर भारताची जागतिक मुत्सद्देगिरी अधोरेखित केली. चाबहार आणि हैफा या दोन महत्त्वाच्या बंदरांमुळे भारताचे दोन्ही देशांत आर्थिक हितसंबंध असून आता BRICS अध्यक्षपद आणि सर्व पक्षांशी संबंध टिकवून ठेवायची क्षमता भारताला सध्याच्या जागतिक संकटात अपरिहार्य मध्यस्थ बनवत आहे.काय म्हणाले रॉबर्ट कियोसाकी काय म्हणाले रॉबर्ट कियोसाकी
प्रख्यात अमेरिकन लेखक आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारताच्या भूमिकेचे लक्ष ठेवून राहायला सांगितलं आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’च्या लेखकाने भारताच्या वाढत्या महत्त्वावर भर दिला आणि जगाला त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले असून इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजनैतिक संबंधांमध्ये भारत मध्यवर्ती भूमिका कसं बजावत आहे याकडे जगाचं लक्ष वेधलं.
मोदी-ट्रम्प यांच्या तिसऱ्यांदा फोन-कॉल मोदी-ट्रम्प यांच्या तिसऱ्यांदा फोन-कॉल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकत्याच फोनवरून झालेल्या संभाषणाच्या पार्श्वभूमीवर कियोसाकी यांनी मते व्यक्त केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये कियोसाकी यांनी सांगितले की, ट्रम्प-मोदी यांच्यात फोन-कॉलवरून सुमारे 40 मिनिटे बोलणं झालं. या वर्षी दोन्ही नेत्यांमधले हे तिसरं संभाषण होते आणि मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा बोलणं झालं. त्यांनी पुढे सांगितले की, हे संभाषण अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात संपले आणि ट्रम्प यांचे म्हणणे उद्धृत केले, ‘मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की, आम्ही सर्वजण तुमच्यावर खूप प्रेम करतो.
इराण आणि इस्रायलमध्ये भारताची उपस्थिती इराण आणि इस्रायलमध्ये भारताची उपस्थिती
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील आर्थिक उपस्थितीच्या माध्यमातून भारताच्या अद्वितीय स्थितीवर कियोसाकी यांनी प्रकाश टाकला. इराणमध्ये भारत ओमानच्या आखातावरील चाबहार बंदरात शहीद बेहेश्टी टर्मिनल चालवतो. या प्रकल्पात 550 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली गेली आहे आणि हा करार 10 वर्षांसाठी आहे. चाबहार बंदर भारताच्या मध्य आशियाशी व्यापक कनेक्टिव्हिटी योजनांचा देखील एक भाग आहे.
त्याचवेळी, इस्रायलमध्ये अदानी समूहाने 1.2 अब्ज डॉलर्समध्ये हैफा बंदर विकत घेतले, जे भूमध्य समुद्रावर स्थित असून पूर्णपणे कार्यरत आहे आणि या प्रदेशातील एक प्रमुख सामरिक मालमत्ता म्हणून पाहिले जाते.
इराण आणि इस्रायलशी भारताचे संबंध इराण आणि इस्रायलशी भारताचे संबंध
अशा परिस्थतीत, इराण, इस्रायल, सौदी अरेबिया, UAE, कतार, रशिया आणि चीन यांसारख्या संघर्षात सामील जवळपास सर्वच पक्षांसोबत कार्यरत संबंध राखण्याच्या भारताच्या क्षमतेमध्ये त्याचा प्रभाव कियोसाकी यांनी दर्शवला.
कियोसाकी म्हणतात की संकटाच्या पहिल्या 48 तासांत मोदींनी जोरदार राजनैतिक सहभाग दर्शवला, त्यानंतर अनेक पश्चिम आशियाई नेत्यांशी, त्यानंतर इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी आणि नंतर ट्रम्प यांच्याशी संवाद साधला. कियोसाकी यांनी मोदी आणि पेझेश्कियन यांच्यातील संभाषणाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये भारताने इराणसोबतच्या आपल्या संबंधांची पुष्टी केली.
काळजीपूर्वक विचार करून दृष्टिकोन अवलंबला काळजीपूर्वक विचार करून दृष्टिकोन अवलंबला
व्यापक चर्चा होऊनही भारताने जाहीरपणे संयमित भूमिका घेतली असून नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करत शांतता आणि चर्चेचे आवाहन केल्याचे कियोसाकी यांनी सांगितले. मात्र भारताने अमेरिकेच्या कारवाई किंवा इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याचा निषेध केलेला नाही जे हेतुपुरस्सर तटस्थता भारताला सर्व पक्षांसाठी एक विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून टिकून राहण्यास मदत करत असल्याचा त्यांनी युक्तीवाद केला. कियोसाकी यांनी लिहिले, “राजकारणात, जो देश काहीही बोलत नाही आणि आपले सर्व दरवाजे खुले ठेवतो, तोच अनेकदा त्या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा देश असतो.
ट्रम्प-मोदी चर्चेची वेळ ट्रम्प-मोदी चर्चेची वेळ
याशिवाय कियोसाकी यांनी ट्रम्प आणि मोदींमधील फोन-कॉलच्या टाईमिंगवरही लक्ष वेधले. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नाकेबंदी सुरू केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण झाले, जे वाढत्या भू-राजकीय डावपेचांचे संकेत देते. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करत कियोसाकी यांनी शेवटी लिहिले की, ‘भारतावर बारकाईने लक्ष ठेवा.’
