दैनिक चालू वार्ता
खेड/येलवाडी प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे
संत तुकाराम महाराज यांच्या तपोभूमी श्रीक्षेत्र खेड तालुक्यातील येलवाडी ग्रामपंचायत निवडणूक २०२२मध्ये निवडणूक बिनविरोध झाली त्यामध्ये काही सदस्य बिनविरोध म्हणून अडीच वर्षे करता निवड झाली त्यांनी मागील काही महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामे दिले त्या अनुषंगाने परत येलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज स्वीकारण्यात आले त्यानंतर काही ग्रामस्थांनी आपले अर्ज माघारी घेतले त्यामुळे तिन सदस्य पदासाठी अर्ज कायम राहिले दि १७ रोजी खेड तहसील कार्यालय मध्ये ग्रामपंचायत सदस्य पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
येलवाडी ग्रामपंचायत ३ जागा साठी निवडणूक बिनविरोध वॉर्ड नंबर २ मधे अतुल रामदास गाडे वॉर्ड नंबर ३ मधे मनीषा रूपेश जाधव , अनिकेत तानाजी गाडे तसेचा ज्यांचा या बिनविरोधचे खरे मानकरी ज्यांचा पुढाकाराने बिनविरोध निवडणूक पार पडली ते संचालक सरपंच रणजित गाडे माझी सरपंच अशोक बोत्रे आणि अनिल बोत्रे आणि तुषार गाडे ज्यांनी गावचा हिताचा विचार करून मानचा मोठेपण दाखून आपला फॉर्म माघे घेऊन बिनविरोध केले असुन या तिन्ही सदस्यांनी ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज संत भागीरथी माता या मंदिरातजाऊन आशीर्वाद घेऊन ग्रामस्थांनी या तिन्ही सदस्यांना अंगावर गुलाल भंडारा उधळत फटकाचे बाजी आनंद उत्सव साजरा केला असून ग्रामपंचायत च्या समोर मोठा जल्लोष साजरा केला
श्री अतुल गाडे. श्री अनिकेत गाडे.सौ मनिषा ताई जाधव यांची येलवाडी ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल परिसरात नागरिकांकडुन अभिनंदन शुभेच्छा दिल्या असेच गावात एकमत कायम राहणार आहे या पुढच्या काळात निवडणूक बिनविरोध होईल
रणजित गाडे ग्रामपंचायत येलवाडी सरपंच सौ मनिषाताई रुपेश जाधव एक शेतकरी असून त्यांच्या कुटुंबातील मनिषाताई रुपेश जाधव यांचे सासू सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होती त्यांच्या निधनानंतर दहा वर्षानंतर जाधव घराण्यातील त्यांची सून मनिषा ताईजाधव पुन्हा बिनविरोध सदस्य पदी निवड झाल्यामुळे या पंचक्रोशीत कौतुक करत आहेत मनिषा ताईजाधव यांनी महिला बचत गट संत भागीरथी भजनी मंडळ तसेच समाजातील कोणत्याही कामात अग्रेसर असतात
सौ.मनिषाताई रुपेश जाधव
नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य
ग्रामपंचायत येलवाडी
