साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर; बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण धोरणासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना सुखावणारा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. लवकर राज्य सरकारकडून या निर्णयांबाबतचा तपशील जाहीर केला जाईल.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)-
महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), 2026 जाहीर…
प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. या वर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार.
(नगर विकास विभाग )
राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार – व्यवसायाच्या संधी.
(महसूल विभाग)
राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता.
(महसूल विभाग)
मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या हालचाली, लोढांचं पालिकेला पत्र
मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालयाचे नाव बदलण्यासाठी भाजप आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र दिले आहे. त्यांनी दुसऱ्यांदा के.ई.एम. रुग्णालयाच्या नामांतराची मागणी केली आहे. के.ई.एम. रुग्णालयाचे नाव “कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” करावे, अशी लोढा यांची मागणी आहे. या नामांतराच्या मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधीही लोढा यांनी नाव बदलावे अशी मागणी केली असताना वाद झाला होता . ब्रिटिशांच्या काळातील हे नाव असल्याने ते बदलण्याची शिफारस लोढांनी केली आहे.
