सरकारकडे नेमकी मागणी काय?
मराठा आरक्षण उपस्थिती बरखास्त करा अशी थेट मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे. उपसमितीचे अध्यक्ष पदावरून विखे पाटील नाव कमवतील असं वाटत होतं मात्र त्यांनी नाव घालवलं, असा थेट हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मराठा समाजाच्या हक्क आणि प्रश्नासाठी स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे देखील जरांगे पाटील म्हणाले. धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपससमितीने मराठा समाजाच्या सुखदुःखाकडे लक्ष द्यायचं असतं मात्र त्या साठी त्यांच्याकडे वेळ नाही विदुषकी लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे. सातारा गॅजेटसाठी आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल करत जरांगे पाटील यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं आहे, असे देखील ते म्हणाले.
मराठा आरक्षण उपसमितीच्या कामावरून मनोज जरांगे पाटील नाराज
मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावायला विखे पाटलांकडे वेळ नाही, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे. सातारा गॅझेटला आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची? उपसमिती काय करते हे कळत नाही. देशाच्या आणि जगाच्या नकाशावरून मराठा साम्राज्य गेलं आहे.
विखे पाटील फक्त नावाला त्या समितीवर बसले आहे. मराठा आरक्षण उप समितीच्या कामावरून मनोज जरांगे पाटील नाराज असून त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले.
भोंदू खरातवर काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
भोंदू खरातवर देखील मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरात बाबा हा श्रीमंत लोकांचा बाबा असून तो गरिबांचा बाबा नाही. गरीब लोक श्रद्धा पळतात अंधश्रद्धा पाळत नाहीत. मंत्रीपद मिळेल म्हणून काही नेत्यांनी खरंच मूत्रप्राशन केलं. हे लाजिरवाण असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी खरात दरबारात हजेरी लावणाऱ्या राजकीय नेत्यांवर थेट हल्लाबोल चढवला.
