नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दारुण पराभव झाला. या महापालिका निवडणुकांची मदार ज्या वसंत मोरे यांच्यावर होती त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झाला.
त्यामुळे वसंत मोरे यांचे पुढे काय होणार? त्यांना पक्ष संघटनेत संधी मिळणार का? अशा चर्चा सुरू होती. अखेर वसंत मोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने जवळपास 65 ते 70 जागा लढवल्या मनसे आणि काँग्रेसची युती करून ही निवडणूक लढण्यात आली. मात्र जो फायदा मनसे आणि शिवसेनेचा काँग्रेसला झाला तितका फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला काँग्रेसच्या झाल्याचे पाहायला मिळालं नाही.
त्यामुळे अवघ्या एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेला समाधान मानाव लागले. त्यानंतर पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल होतील, असे सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये मेळावा झाला.
या मेळाव्यात संजय राऊत यांनी सांगितले, येत्या अडीच-तीन वर्षांत कुठल्याही निवडणुका नाहीत. अशावेळी शिवसेनेचे संघटनात्मक काम तळागाळापर्यंत पोहोचवावे लागेल. लोकांमधील मिसिंग लिंकचा शोध घेऊन शिवसेनेचे काम केले, तर पुण्यात शिवसेना ‘एक्स्प्रेस वे’प्रमाणे धावू लागेल. याच दरम्यान त्यांनी घटनात्मक बदलाबाबत देखील संकेत दिले होते.
त्यानुसार ठाकरे सेनेने संघटनात्मक बदल केल्या असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पुणे शहरप्रमुखपदी वसंत मोरे आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
सहसंपर्कपदी चाबुकस्वार
पुणे शहर समन्वयक ही जबाबदारी नितीन गावडे यांना देण्यात आली आहे तर सहसंपर्कप्रमुख म्हणून संजय मोरे (पुरंदर, हडपसर विधानसभा), गजानन थरकुडे (भोर, खडकवासला विधानसभा) यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या सह संपर्क प्रमुखपदी गौतम चाबुकस्वार यांना संधी देण्यात आली आहे.
Shivsena UBT : आदित्य ठाकरेंना मिळणार सर्वात मोठी जबाबदारी : बाळासाहेबांनी खास उद्धव ठाकरेंसाठी तयार केलेल्या पदावर होणार नियुक्ती, मुहूर्तही ठरला!
