सुनेत्रा पवारांनी अजितदादांचा रेकॉर्ड मोडला…
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. 14 व्या फेरीची आकडेवारी समोर आली असून, 1 लाख 21 हजार 855 मतांचा मोठा टप्पा त्यांनी ओलांडला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. सुनेत्रा पवार यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. अजून काही मतमोजणीच्या फेऱ्या बाकी अजून त्या संपल्यानंतर त्यांना एकूण किती मतं मिळतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मात्र, अजित पवार यांचा 2024 मधील विजयाचा विक्रम सुनेत्रा पवारांनी 14 व्या फेरी अखेरीस मोडला आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1 लाख 1 हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता.
मात्र, पोटनिवडणुकीच्या अवघ्या 14 व्या फेरीतच सुनेत्रा पवार यांनी 1 लाख 21 हजार 855 मतांचा मोठा टप्पा ओलांडला आहे. यावरुन बारामतीकरांनी अजित पवारांच्या पाश्चात सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास टाकल्याचे लक्षात येते.
सुनेत्रा पवार (एकूण मते): १,२१,८५५
इतर उमेदवार (एकूण मते): २,४६८
राहुरीत अक्षय कर्डिलेंची आघाडी कायम
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सोळाव्या फेरी अखेरची मतांची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले तब्बल 80411 मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत केवळ 14555 मतं मिळाली आहेत.
भाजप अक्षय कर्डिले – 80411
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 14555
वंचित संतोष चोळके- 4847
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6960
