जय पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं सर्वांत मोठं विधान !
बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी जनता दरबार घेतला. या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेल्या बारामतीकरांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.
यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा 2029 साठी बारामतीमधून सुनेत्रा पवारच उमेदवार असतील. त्यासोबत त्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील असे मोठं वक्तव्य केले होते.
या वक्तव्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या राज्यात भाजप सोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल, अशी प्रतिक्रिया जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मला असं वाटतं की, या राज्यात भाजप सोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल.
जय पवारांचे वक्तव्य
काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे.
..अन् चर्चा रंगली
पुढील पाच वर्षे राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत. पण 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयार आत्तापासून केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय झाल्यानंतर येथे सुनेत्रापर्वाचा आरंभ झाला आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चा केल्यानंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी भाष्य केले होते. जय पवार देखील आता अॅक्टिव्ह झाले झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे एका जागेसाठी तीन पवार मैदानात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
