
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
सर्व सामान्य लोकांना काय हवय त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच ध्यासातून हे महाविकास आघाडी सरकार काम करीत असून राजकारण पक्षीय भेदाभेदांच्या भानगडीत न पडता सर्व सामान्यांच्या कल्याणासाठीच मला झटायचे आहे असे प्रतिपादन विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी केले महाराष्ट्र दिना निमित्ताने मोखाडा तहसील कार्यालयांचे ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संजय गांधी विधवा महिला सेवा निवृत्ती योजना अंतर्गत २० हजारांचा लाभ दिला जातो त्याचे वाटप तसेच जात प्रमाणपत्र,सामुदायिक वनपट्टे रेशनकार्ड आदिंचे वाटप यावेळी भुसारा यांच्या हस्ते झाले. यावेळी भुसारा यांनी सांगितले की खरतर महराष्ट्र दिन कामगार दिनाचे महत्व आजच्या पिढीला कळायला हव कारण कि आज या ध्वजारोहणास जे उपस्थित आहेत त्यांनाच याचे महत्व आहे अस मानावे लागेल तसेच यावेळी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात आणलेला निधी त्याशिवाय येथील सर्व शासकीय कार्यालयांच्या ईमारती सुसज्ज करण्याबरोबरच कारभारही शासन आपल्यादारी प्रमाणे सुखकर करावयाचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला सार्वजनिक कल्याणकारी योजना राबवण्याबरोबरच वैयक्तिक योजनाही आता महाविकास आघाडी सरकार मोठ्याप्रमाणावर राबवत असून ज्या प्रमाणे ट्रॅक्टर वाटप पिक अप साठी अनुदान देताना अगोदर लक्षांक ठरवला जात होता आता मात्र मागेल त्याला या योजना देण्याची तयारी शासनाची असल्याचे भुसारा यांनी सांगितले.
आम्ही लहान असल्यापासूनच ध्वजारोहण म्हटल कि एक वेगळी उर्जा असायची तेंव्हा पासून आजवर मी एकही ध्वजारोहणाचा कार्यक्रम चुकवला नाही मात्र आजच्य पिढी मध्ये ती उर्जा दिसून येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच आपण सर्व प्रथम भारतीय आहोत यामुळे आजच्या जातीयतेच्या दूषित वातावरणात आपल्याला आपली मैत्री संबध साथ जपत एक धर्मनिरपेक्ष भारत कायम ठेवायचा असल्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले यावेळी कार्यालयातीन स्वच्छता राखली केली पाहिजे लोकांची कामे वेळेत व्हायला हवी असे मत जिप सदस्य प्रकाश निकम यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास नगराध्यक्ष अमोल पाटील उपनगराध्य नवसु दिघा सभापती आशा झुगरे उपसभापती लक्ष्मीताई भुसारे, संचालाक बाबुराव दिघा गटनेते प्रमोद कोठेकर बांधकाम सभापती प्रतिक पाघारे, नगरसेवक अमजद अंसारी गभाले, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.