
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
देशभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. इस्लाम धर्मात प्रमुख असलेल्या सणांपैकी ईद उल फित्र आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात महिनाभर कडक असे उपवास केल्यानंतर मुस्लीम बांधव ईद साजरी करत असतात. ईदच्या निमित्ताने आडगाव येथील मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्यात आली कोरोनामुळे मागील दोन वर्षात सर्वच सण-उत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे ईदला देखील मागील दोन वर्षात सामूहिक नमाज पठण झाले नव्हते. यंदा निर्बंध कमी झाल्याने मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करत आहेत. एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच प्रतिनिधी मंगेश पाटील क्षीरसागर, सचिन पाटील ,बळी पाटील, डी सी धनसडे, पत्रकार बालाजी धनसडे बंडु बोमनाळे दैनिक चालू वार्ता चे प्रतिनिधी राम पाटील क्षीरसागर यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लीम बांधवांच्या वतीने सुरकुंंभा वाटप करण्यात आले यावेळीअकबर शेख ,शैलानी,गफार शेख निजामोदिन,शादुल,शेख,जबार शेख ,अल्ताफ शेख ,शेख जिलानी ,शेख सलीम,हूसेन शेख,शेख सत्तार,खुदूस सय्यद शेख ईस्राईल समस्त मंडळी उपस्थित होती