
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्ह्याच्या भाजपा महिला जिल्हाध्यक्ष निवेदिताताई चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपा ग्रामीणच्या संघटनात्मक दौऱ्याला सुरुवात झाली आहे.पक्ष बळकटीकरण तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविणे आदी विषयावर चर्चा होणार आहे.रविवारी १ मे रोजी चांदुररेल्वे,३ मे रोजी मोर्शी शहर व ग्रामीण,४ मे रोजी चांदुरबाजार,५ मे रोजी अंजनगाव सुर्जी,६ रोजी नांदगाव खंडेश्वर,८ रोजी भातकुली येथे १० मे मंगळवारी अचलपूर शहर व ग्रामीण येथे ११ मे रोजी चिखलदरा व धारणी,१२ रोजी वरुड,१३ मे रोजी तिवसा येथे,१४ मे रोजी अमरावती ग्रामीण ,१५ मे रोजी धामणगाव रेल्वे,१६ मे रोजी दर्यापूर ग्रामीण व शहर येथे मंडळ अध्यक्ष,मंडळ सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल यामध्ये मंडळ कार्यकारिणी सदस्थ,मंडळ मोर्चा,आघाडी जिल्हा पदाधिकारी,सर्व कार्यकारिणी सदस्य,मंडळातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख,प्रदेश पदाधिकारी व सदस्य या संघटनात्मक दौऱ्यात उपस्थित राहणार आहे.