
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
अहमदपूर :-
जगाचा पोशिंदा शेतकरी असून देखील शेतकऱ्याला निसर्गाच्या वेगवेगळ्या अवकृपेमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याने आता शेतकऱ्यांनी शेद्रींय शेती करुन शेतीला जोडधंदा उभारण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी काजळ हिप्परगा येथील विराट अशा किर्तन सोहळ्यात केले.
अहमदपूर तालुक्यातील मौजे काजळ हिप्परगा येथील स्व.शिवराज गोरटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आपल्या किर्तन सोहळ्यातून समाजप्रबोधन करत होते.किर्तनाच्या सुरुवातीला इंदोरीकर महाराजांचा यथोचित सन्मान पुर्वक सत्कार गोरटे परिवाराच्या वतीने माजी सभापती सुधीर गोरटे व पुंडलिक गोरटे यांनी केला.
इंदोरीकर पुढे म्हणाले की आजची तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडली आहे.तरुनांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असुन विज्ञानाला आध्यात्मिक जोड देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगितले. सध्या गावो गावी लग्न कार्यात अनाठायी खर्च केला जात आहे.तो खर्च टाळून गावातील शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे आवाहन निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
सदरील किर्तन सोहळ्यात खासदार सुधाकर श्रृंगारे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी, पोलिस उपअधीक्षक बलराम लंजीले , सुधीर गोरटे, पुंडलिक गोरटे, डॉ.पांडूरंग कदम, सरपंच संजय बेंबडे,जिवणकुमार मदेवाड, गोविंदराव गिरी, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाढे, माजी उपसभापती निळकंठ पाटील, राजू खंदाडे, अँड.अमित रेड्डी,माजी सभापती चंद्रकांत मद्दे, डॉ.निलेश मजगे, अँड.किशोर कोरे, बापूराव गोखरे यांच्या सह अनेकजण व्यासपीठावर उपस्थित होते.
सदरील किर्तन सोहळा पाहण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता.